Sunday, February 24, 2013

♡ मन माझे..♡ तिने आज गुन्हा केला

तिने आज एक गुन्हा केला
माझ्यावर प्रेम करण्याचा
माझ्या मनी नसतानाही
मनात माझ्या शिरण्याचा.....!!

तिने आज गुन्हा केला
माझ्या आठवणी जपण्याचा
त्याच आठवणी सोबत
नवा संसार थाटन्याचा.....!!

मलाही आता वाटु लागलय
जावून तिला सांगाव
तिच्या रंगीबेरंगी प्रेमात
थोड ओलचिम्ब रंगाव.....!!

पण...

शेवटी तिनेच तोडला माझा विश्वास
नाही ठेवली जागा घेण्यास एक श्वास
तिच्या मनात कोणी दुसराच बसलाय
मांडन्या आधीच माझा हा संसार मोडून पडलाय.....!!

आता मीही एक गुन्हा करणार आहे
माझ्या प्रेमाच चित्र साकार करणार आहे
म्हणतात पहिल प्रेम विसरता येत नाही
पण तेच मी विसरणार आहे.....!!

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment