Wednesday, February 27, 2013

♡ मन माझे..♡ ऐक क्वार्टर कमी पडते

दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडत

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा कार्यक्रम पीणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँड प्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय दारु दा‍रु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहेप्रत्येक पॅकमागे तीची

आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलता

प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे , मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते 

याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते………………… 

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

1 comment: