Wednesday, February 27, 2013

Re: ♡ मन माझे..♡ घटना 2 - माझा दॄष्टीकोन

.......

2013/2/27 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
घटना 2 - माझा दॄष्टीकोन

वेळ - रविवार सकाळी कधीही

पार्श्वभूमी - सुट्टीचा दिवस असल्याने बायकोला डोळ्यासमोर कामांचा डोंगर दिसतोय. तुम्ही सुखाने लोळत आहात. बायकोच्या पहिल्या हाकेलाच तुम्ही उठता.

बायको - ऊठा... ८ वाजले.
(तुम्ही ताडकन उठून बसता.)
तुम्ही - अरे यार... इतका वेळ कसा झोपलो? गजर वाजलेलाही समजला नाही. जाग कशी नाही आली मला.
बायको - काय झालं रे?
तुम्ही - काही नाही गं, आज जरा आवराआवरी करायचा विचार होता. पण तू कशाला उठलीस इतक्यात? झोप अगं थोडा वेळ. किती दमतेस आठवडाभर. ऑफिस घर दोन्ही सांभाळता सांभाळता पिट्ट्या पडतो अगदी तुझा.
बायको - असू दे रे, त्यात काय इतकं. सगळ्याच बायका करतात.
तुम्ही - सगळ्यांचं मला माहिती नाही. तू पड जरा. मी पटकन कामं संपवतो. चहा टाकतो आणि तुला उठवतो.
बायको - वेडा आहेस का अरे. खरं म्हणजे तूच झोप थोडावेळ. ह्या आठवड्यात खूपच काम होतं तुला.
तुम्ही - अगं पण...
बायको - माझं होईल आवरून इतक्यात. मग उठवते तुला. मस्त आलं घालून चहा करते.
तुम्ही - बरं. लवकर उठव पण. तू कामं करत असताना लोळत पडणं आवडत नाही मला.

हाय काय अन् नाय काय. कौतुक मिश्रित प्रेमळ कटाक्ष्याच्या वर्षावात द्या ताणून आता सुखाने. जे काम कितीही आदळाअपट केली असती तरी झालं नसतं ते केवळ १ मिनिटाच्या डांबरटपणाने झालं. पण ह्या युक्तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात करावा.

अन्यथा एके दिवशी बायको खरंच कामाला लावेल आणि तुमचा सप्तरंगी पोपट होईल.

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
No comments:

Post a Comment