Wednesday, February 27, 2013

Re: ♡ मन माझे..♡ प्रेमभंग...........................

its true pallavi 



2013/2/28 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
प्रेमभंगासारख्या नाजूक मनाला खोलवर भिडणा-या विषयाला समजून घेण्यासाठी हा लेखप्रपंच. साहित्याने नेहमीच प्रेमात पडण्याचा आरोप हृदयावर केला आहे. त्या अनुषंगाने प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करण्यासाठी हृदयाचाच वापर केला जातो. 'दिल ही टूट गया, अब जीके क्या करे....' अशी काही हिंदी सिनेमातील गाणी अजरामर झाली
प्रेमभंग Heart Break'दिल टूटनाह्ण वगैरे जेव्हा होतं, तेव्हा होणारा दर्द देखील तेवढाच विव्हळ करून जातो. स्वाभाविक आहे, व्यक्ती जितकी जास्त आवडती, तितकच प्रेमभंगाचे दु:ख अधिक आणि या दु:खाचे दुहेरी परिणाम दिसतात. म्हणजे शारीरिक आणि मानसिक
 
 प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांच्या हृदयावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो
 
प्रेमाचे साकडे - थोड्याच काळात या वेदनेचं रूपांतर रागात व्हायला लागतं. प्रचंड राग येतो, तो राग मग कधी स्वत:वर निघतो तर कधी इतरांवर. 'मीच का?' असा प्रश्न मनात पिंगा घालू लागतो आणि मग हरवलेलं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण देवाकडे किंवा नशिबाकडे अथवा ज्या व्यक्तीने आपला प्रेमभंग केला त्याच्याकडे साकडे घालू लागतो.

हळूहळू वास्तविकतेची जाणीव व्हायला लागते आणि रागाची जागा घेते एक तीव्र असहायतेची भावना. नैराश्याच्या गर्तेत तो मनुष्य फेकला जातो. कोणाशी बोलावंसं वाटत नाही. आयुष्य निरस वाटू लागतं. ब-याच वेळा आत्महत्येचे विचारदेखील येतात. पण कालांतराने ही वेदनेची, दु:खाची काळरात्र संपते. दु:खाची कढ ओसरू लागते. आयुष्य पुन्हा थोडं सुसह्य होऊ लागतं आणि अखेरीस प्रेमभंगाचं सत्य स्वीकारायची मनाची तयारी होते. जरी आनंद वाटत नसला तरी आपण जीवन कंठू शकतो किंवा पुन्हा सुरू करू शकतो. ही भावना होऊ लागते. म्हणतात की, प्यार के मर्ज की कोई दवा नहीं! त्याचप्रमाणे प्रेमभंगावरदेखील कोणतही औषध नाही. मात्र हळव्या झालेल्या मनावर फुंकर घालू शकतील असे काही मार्ग, उपाय निश्चितच आहेत.

1) नेहमीच्या कामाच्या रहाटगाड्यातून उसंत घ्या, एक ब्रेक घ्या. आराम करा, भरपूर रडून घ्या.

2) तुमच्या मनातील वेदना, दु:ख कोणाबरोबर तरी शेअर करा, दु:खाची कढ स्वत: गिळू नका, बोलून टाका.

3) नवीन काहीतरी अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करा, ज्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल आणि दु:ख विसराल.

4) ज्या व्यक्तीने तुमचा प्रेमभंग केला आहे, त्या व्यक्तीशी कटाक्षाने संपर्क टाळा.

5) समाजोपयोगी कामांमध्ये स्वत:ला गुंतवून घ्या.

6) आत्मपरीक्षण करा, या अनुभवातून आपण काय शिकतो याचा विचार करा.

7) लक्षात ठेवा की, Time is the best healer.. जसे दिवस जातील तसे दु:खदेखील कमी होईल.

8) प्रेमभंग ही मनावर झालेली जखम आहे. जखम भरून येताना वेदना होणारच. त्यामुळे अधूनमधून तुम्हाला खूप दु:ख, राग, अपराधीपणा किंवा भीती वाटणं साहजिक आहे. जसा वेळ जाईल तसं या भावनांची तीव्रता कमी होईल. मात्र तसं जर होत नसेल, 2-3 महिन्यांनंतरदेखील दु:खाची तीव्रता कमी होत नसेल किंवा मनात सतत आत्महत्येचे विचार येत असतील तर किंवा आत्महत्येचा एखादा असफल प्रयत्न केला असेल तर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.....................

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment