आणू कुठून हुरुप
श्वास घेण्यासाठी आता...?
झाले सगळे कुरुप
साथ सोडून तू जाता...!
माझ्या अवती भवती
जग देखणे देखणे...
माझ्या मनातले परी
लोप पावले चांदणे...!
सुख दुःख सन्मान
संज्ञा ज्यास स्थितप्रज्ञ...
कशी सुखदुःखातील
असून मी हतप्रज्ञ...?
आता हरपली स्मिते
आता गोठली आसवे...
सारे कसे स्वादहीन
चाखले जे तुझ्यासवे...!
लेखणी संदर्भ :आठवणीतुन तुझ्या ...!!
No comments:
Post a Comment