Monday, February 25, 2013

♡ मन माझे..♡ भरलेला पाऊस

भरलेला पाऊस मी
भरलेल्या डोळ्यांनी पहिला होता
भर पावसात हात निसटतानाहि
अश्रू डोळ्यात राहिला होता..........

होते रुसवे फुगवे होते अनेक बहाणे
तिला चिडवून तिलाच समजाविणे
तिच्या आठवणीत मन माझे शहारले होते
तिच्या सोबत घालवलेले क्षण तेव्हा डोळ्यातून निसटले होते............

माझे अश्रू सुद्धा त्या पावसात मिसळले होते
साथ माझी सोडताना मी त्यांना पहिले होते
मनाचा नभ डोळ्यांच्या कडानवर विसावला होता
तू दूर गेल्यावर तो बांधहि त्यांनी फोडला होता..............

सुटलेला गार वारा मला स्पर्शुनी सांगत होता
आता हा खेळ फक्त आठवणींचा राहिला होता
भरलेला पाऊस मी
भरलेल्या डोळ्यांनी पहिला होता.................


--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment