Thursday, February 21, 2013

♡ मन माझे..♡ प्रेमपत्राचा मायना

प्रेमपत्राचा एक मायना
प्रिय.......
अर्जदार:-
विषय:-प्रेमाचा स्वीकार करण्याबाबत,
मा, महोदया
वरील विषयास अनुसरुन कारणे विनंती अर्ज
करतो कि,
आपणास प्रथमत: पाहिल्याक्षणीच
माझा कलेजा खलास झाला होता. तसेच
माझ्या ह्रदयातील प्रेमभावना उचंबळुन
आल्या होत्या.
माझा जीव आपणावर जडला असुन, मज
पामराच्या प्रेमाचा स्वीकार करुन
मजला ऊपकृत करावे, तसेच
मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी हि नम्र
विनंती.
तसेच तुमचा होकार असेल तर अशाच एका गुप्त
खलित्याद्वारा निरोप धाडावा अगर नकार
असल्यास हा खलिता आपल्या बंधुस न
दाखवता गुप्त स्थानी विसर्जित करावा.....
कळावे
फक्त तुमचाच.....



--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment