Saturday, February 23, 2013

Re: ♡ मन माझे..♡ तो पुन्हा एकदा आला होता

रोहित आणि सचिन मी खूप आभारी आहे तुमची ……तुम्हाला हि कविता खूप आवडली यासाठी. रोहित कडव्यामध्ये तुम्ही अजून एक ओळ घातली खूप छानच केलेत. त्यामुळे कवितेला अजून सौंदर्य प्राप्त झाले. खरच रोहित मरण यातना आणि विरह यातना या मध्ये काहीच फरक नसतो. तुम्ही बोललात ती एक एक ओळ खरी आहे …… त्या आठवणी प्रत्येक वेळी नव्या जखमा करून जातात………अशा वेळी मनाची स्थिती काय होते हे फक्त तो किंवा तीच समजू शकते …… ज्यांनी हे सर्व सहन केले आहे.  

2013/2/22 Rohit Desai <rohit1432009@hotmail.com>
पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावलं होतं

खूप बोलून घेतलंय, 
खूप हसून घेतलंय,
अन खूप सोसून हि घेतलंय...!!!
सारेच दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.....

पल्लवी...तुझ्या या कवितेतील ह्या कडव्यामध्ये  एक ओळ मी आणखी घातली आहे ...मला अशा आहे यामुळे तू दुखावती जाऊ नये...!!!!
ह्या ओळीमंध्ये विरहाचे  दुख अन प्रेम भावना दिसून येतात...!!
खरंच त्याच्या किंवा तिच्या जीवनातून तो किंवा ती गेल्यानंतर जो त्रास होतो ज्या भावना दुखावल्या जातात...त्या भरून यायला खूप वेळ जातो..त्या क्वचितच भरून येतात..अन त्या भरून जरी आल्या तरी त्याच्या आठवणी काय भरून येत नाहीत..त्या आठवणी प्रत्तेक वेळी नव्या जखमा करून जातातच....!!
खूपच सुंदर कविता आहे तुझी...भावली मनाला...!!!

Thanks & Regards
Rohit Desai

ATC  TelecomTower Corporation Pvt. Ltd

+ 91-895-617-1814 (Mobile) 

Date: Fri, 22 Feb 2013 13:54:38 +0530
Subject: ♡ मन माझे..♡ तो पुन्हा एकदा आला होता
From: pallavikelkar1119@gmail.com
To: mannmajhe@googlegroups.com

तो पुन्हा एकदा आला होता
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मन केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.

सारे दरवाजे मी
बंद केले होते
ओठांनाही मोठे कुलुप लावले होते
तो पुन्हा एकदा आला होता
ते सारे दरवाजे उघडायला
नाहीच उघडले तरी
थोड्या चिरा पाडायला.

त्याचे-माझे मित्र-मैत्रिणी
केव्हाच दूर गेले होते
अनोळखी लोकांशी नवीन
बंध जोडले होते
तो पुन्हा एकदा आला होता
जुन्या आठवणी काढायला
कोण आता कुठे असतो
हे मलाच विचारायला.

पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावत होतं
खूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय
सारे दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.

तो आता निघून गेलाय
माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून
पुन्हा बांध बांधायचेत
आणि पुन्हा ओठ कसायचेत
मनाला समजून सांगायचंय
पटेपर्य़ंत बोलत राहायचंय
की मी त्याला विसरलेय
मी पुन्हा एकदा
त्याच्यावाचून जगायला शिकतेय.

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
No comments:

Post a Comment