chan.............
2013/2/21 Dipali Vanjole <dipalivanjole13@gmail.com>
कोमेजून निजलेली एक परी राणी,उतरले तोंड डोळा सुटलेले पाणीरोजचेच आहे सारे काही आज नाहीमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाहीझोपेतच घेतो तुला आज मी कुशीतनिजेतच तरी पण येशील खुशीतसांगायची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
आटपाट नगरात गर्दी होती भारीघामाघूम राजा करी लोकलची वारीरोज सकाळीस राजा निघताना बोले,गोष्ट सागायचे काल राहुनिया गेलेजमलेच नाही काल येणे मला जरीआज परी येणार मी वेळेतच घरीस्वप्नातल्या गाव मध्ये मारू मग फेरीखऱ्या खुऱ्या परी साठी गोष्टीतली परीबांधीन मी थकलेल्या हातांचा झुलादमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ऑफिसात उशिरा मी असतो बसूनभंडावले डोके गेले कामात बुडूनतास तास जातो खाल मानेने निघूनएक एक दिवा जातो हळूच विझूनअशावेळी काय सांगू काय काय वाटे
अथवा सोबत पाणी डोळ्यातून दाटेवाटते की उठूनिया तुझ्या पास यावेतुझ्यासाठी मी पुन्हा लहान ही व्हावेउगाचच रुसवे नी भांडावे तुझ्याशीचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशीउधळत खिदळत बोलशील काहीबघताना भान मला उरणार नाहीहासुनिया उगाचच ओरडेल काहीदुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असाक्षणा क्षणा वर ठेवू खोडकर ठसासांगायची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभईमउ -मउ दूध भात भरवेल आईगोष्ट ऐकायला मग येशील न अशीसावरीच्या उशीहून मउ माझी कुशीकुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काहीसदोदित जरी का मी तुझ्या पास नाहीजेऊ माखू न्हाऊ खाऊ घालतो न तुलाआई परी वेणी फणी करतो न तुलातुझ्या साठी आई परी बाबा पण खुळातो ही कधी गुपचूप रडतो रे बाळासांगायची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
बोळक्या मध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दातआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा मउ भातआई म्हणण्या आधी सुद्धा म्हणाली होतीस बाबारांगत -रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबालुटू -लुटू उभा राहत टाकलास पाउल पहिलंदूरचं पाहत राहिलो फक्त , जवळचं पाहायचं राहिलं
असा गेलो आहे बाळा पुरा अडकूनहल्ली तुला झोपेतच पाहतो दुरूनअसा कसा बाबा देव लेकराला देतोलवकर जातो आणि उशिरानी येतोबालपण गेले तुझे गुज निसटूनउरे की तुझ्या माझ्या ओंजळी मधूनजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसेनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसेतुझ्या जगातून बाबा हरवेल का ग?मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्येबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये?….
--Thanks & RegardsDipali Vanjole--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

No comments:
Post a Comment