Rahashil nehmi aathawanit majya...
Aas ajunhi partun yenyachi tujya...
Gele jari he sharir door
Hirmusala ha jeev partis tujya,
Aathawatat te partyek kshan jewha....
Vede ooghaltat nakalat dolyatun majya,
Ekate sale aaj jari mi........
Nehmi jawal astil aathawani tujya.....
Door salo jari aata..
Rahashil nehmi aathawanit majya...
Aas ajunahi partun yenyachi tujya.......
Aas ajunhi partun yenyachi tujya
2013/2/15 <mannmajhe@googlegroups.com>
Group: http://groups.google.com/group/mannmajhe/topics
- होते कॉलेज माझे खास !!! [1 Update]
- श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?" [3 Updates]
- आयुष्यं". [3 Updates]
- मी जेव्हा मरीन ना!!! [1 Update]
- आई हे फक्त नाते नाही [3 Updates]
- कुणालाच नाही ठाऊक [2 Updates]
- १० :१५ ची CST लोकल Must Read [4 Updates]
- वाचुन बघाच …. [2 Updates]
- "आमचा बाप" [4 Updates]
- आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या !! [2 Updates]
sachin auti <sachinauti.2007@gmail.com> Feb 15 01:36PM +0530
sunder
*Regards,*
*Sachin Auti*
*Indiabulls Real Estate Ltd.*
*Mobile No.+91 8655055560*
* +91 9860364770*
2013/2/15 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
Pallavi Tulaskar <pallavitulaskar236@gmail.com> Feb 15 12:01PM +0530
किती दिवस झाले तुझं पत्र नाही………फोन नाही………..अगदी साधा यस एम यस नाही.
रागावलीस ना माझ्यावर ? कशासाठी पण ? आजवर तुझ्या माझ्या ज्या नात्याला तू '
मैत्री ' म्हणत होतीस त्याच नात्याला मी ' प्रेम ' म्हणालो म्हणून ? तसं असेल
तर मला कीवच करावीशी वाटते तुझी. कारण ना तुला ' मैत्री ' चा अर्थ कळलाय आणि ना
' प्रेमा ' चा. अगदी तू म्हणतेस त्याप्रमाणे तू मैत्रीण असतीस ना माझी तर मी '
तुझ्या माझ्या नात्याला ' ' प्रेमा ' चं नाव दिल्यावर तू अशी रागावली नसतीस
माझ्यावर.
प्रेम आणि मैत्रीत काय फरक आहे माहिती आहे तुला ? मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ
शकतं बऱ्याचदा पण प्रेमातून मैत्रीचा सूर उमटेलच असं नाही सांगता येत काही.
प्रेमातून बऱ्याचदा आकाराला येतो अधिकाराचा अंकुर. आता तू म्हणशील, " मग
श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री ?"
खरं सांगू ! असं नाही सांगता यायचं काही. पण एवढ नक्कीच सांगेन कि प्रेमाच्या
पातळीपर्यंत जाऊन केलेली मैत्री नक्कीच श्रेष्ठ.
तू म्हणशील, " म्हणजे कशी ? "
आभाळासारखी आणि मातीसारखी. क्षितिजाशी पाहिलं तर एकरूप झालेली. प्रत्यक्षात
मात्र नेहमीच एक अंतर राखून असलेली. कुणाच्या भीतीनं नव्हे………..एक मर्यादा
म्हणून.
आता तू म्हणशील, " मग प्रेम कसं असतं ? "
प्रेम असतं असतं नदी आणि समुद्रासारखं………मिलनाची आस असलेलं.
मला माहिती आहे यावर तू काय म्हणणार आहेस ते. आता तू म्हणशील, " बस्स s s s !!!
एवढंच ! प्रेम म्हणजे मिलनच का फक्त ? "
नाही ! प्रेम म्हणजे मिलनच नाही काही. प्रेमाला आणखी एक पदर असतो. श्रद्धेचा
!!!!
होय !!!! श्रद्धेचा. ईश्वरावर असावी तशी श्रद्धा.
म्हणूनच मला मीरा हीच खरी प्रेयसी वाटते कृष्णाची.
प्रसंगी कृष्णासाठी वीष प्राशन करणारी ………पण कृष्णाशी एकरूप होऊ पहाणारी . आपण
मात्र म्हणतो, मीरेची भक्ती होती कृष्णावर. पण श्रद्धा आणि भाक्तीतला फरक
स्पष्ट करता येईल कुणाला ?
पण आजकाल प्रेमातल्या श्रद्धेच्या या जरतारी पदराची जाणीवच नसते कुणाला.
सौन्दर्य……….त्याची ओढ………त्याचं आकर्षण…………त्याची आसक्ती………आजकालच्या प्रेमाची
एवढीच झेप.
मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, हेच ना, " तू जर मीरेला प्रेयसी म्हणतोस
कृष्णाची तर मग राधा कोण ? "
मी राधेला मैत्रीण मानतो कृष्णाची………रासक्रीडे पासून शृंगारापर्यंत कृष्णाला
सोबत करणारी , साथ देणारी……….प्रत्येक पावलाला त्याला समजून घेणारी. आणि
म्हणूनच राधेन मैत्रीची सीमा कधी ओलांडली आणि ती कृष्णाची सखी कधी झाली हे
कळंलच नाही आपल्याला. आणि आपण करत राहिलोत एकंच जप , " राधे – शाम………राधे –
शाम……..राधे – शाम."
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 12:31PM +0530
Apratim.......................
2013/2/15 Pallavi Tulaskar <pallavitulaskar236@gmail.com>
sachin auti <sachinauti.2007@gmail.com> Feb 15 01:29PM +0530
sunder
*Regards,*
*Sachin Auti*
*Indiabulls Real Estate Ltd.*
*Mobile No.+91 8655055560*
* +91 9860364770*
2013/2/15 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
Pallavi Tulaskar <pallavitulaskar236@gmail.com> Feb 15 12:02PM +0530
आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.
अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात
काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात
अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".
Share<http://www.facebook.com/ajax/sharer/?s=4&appid=2347471856&p%5B0%5D=100002188954544&p%5B1%5D=165647063518258>
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 12:32PM +0530
अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं"..khup sundar..................
2013/2/15 Pallavi Tulaskar <pallavitulaskar236@gmail.com>
sachin auti <sachinauti.2007@gmail.com> Feb 15 01:29PM +0530
nice
*Regards,*
*Sachin Auti*
*Indiabulls Real Estate Ltd.*
*Mobile No.+91 8655055560*
* +91 9860364770*
2013/2/15 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 01:27PM +0530
*मी जेव्हा मरीन ना!!! तेव्हा देवाघरी एक अर्ज घेवून जाईन!! - पुढच्या
जन्मासाठी किंवा तुमच्या साठी
१) रात्रीचे १ तास = १२० मिनटे हवीत (कारण=रात्री डोळ्यात झोप आली असते आणि
SMS type करायला फार वेळ लागतो..)
२) जी मुले प्रेमात पडली नाहीत त्याचे ID CARD हवे (कारण= ते कार्ड
दाखवून मुले पेट्रोल वर ५०% सूट मिळवतील - बिचाऱ्याचा काही तरी फायदा होईल -
फक्त मित्रांना फिरवण्यासाठी)
३) ज्या मुली मुलांवर खर प्रेम करत नाहीत... (त्याचे लगेच त्याचा घरच्यांनी
arrange मेरीज करून टाकावे... नायतर फुकट खायची सवय लागेल त्यांना)
४) mobile network ह्यास विनंती असावी कि मुलीना फक्त incoming असावे
(अस पण ते call कधी करतच नाही).. आणि मुलांना call rate मध्ये भारी
discount असावे... (बिचारे pocket money जेवढा नाय मिळत तेवढा मुलीना
phone करण्यात खर्च होतो...)
सर्वात सर्वात महत्त्वाचं
५) मुलीना २ हृदय असावे .. आणि मुलांना १च पण दगडाचे हृदय असावे... (कारण
मुली नेहमी म्हणतात ना .. त्याने माझे हृदय तोडलं आता मला प्रेमात नाय
पडायचं... म्हणून मुले request करू शकतील दुसरया हृदयात adjust करून घे)
आणि मुलांना १च हवे दगडी हृदय कारण कोणत्या मुलीचे दोन्ही हृदय तुटले असतील
तर.. आम्हा मुलांना फार त्रास होवू नये....
... जेव्हा तुम्ही मराल तेव्हा मरा.... पण वर घेल्यावर माझ्या ह्या अर्जावर
तुमची छोटीशी सही जरूर करा....** [image: :D] [image: :D] [image: :D]*
--
Thanks & Best Regards,
,Namdev Patil
(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 12:34PM +0530
आई हे फक्त नाते नाही. ते एक आद्य विद्यापीठ आहे. जन्माला आल्यापासून आपल्या
अखेरच्या श्वासापर्यंत आईच्या कृतीतून, आठवणीतून अनेकदा मार्ग सापडत असतो.
अशीच आपल्या आई कंवरबाई माणिकचंद चंगेडे यांची प्रेरणादायी आठवण लीलावतीबाईंनी
आपल्या या लेखातून जागवलीय...
...................................
माझ्या आईचा जन्म १९११ साली एका लहान गावी रस्तापूर येथे झाला. तिच्या
लहानपणीच तिच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवले. ती मामाकडे लहानाची मोठी झाली.
त्या काळी मुलींना शिक्षण कमीच मिळे. त्याप्रमाणे तिलाही फक्त दुसरीपर्यंत
शाळा मिळाली. प्रखर बुद्धिमत्ता , हुशारी , शाळेची आवड , असूनही तिला शाळा
सोडावी लागली. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच लग्न करून सासरी आली.
इकडे आजी , आजोबा , आत्या व बाबा असे छोटेसे कुटुंब होते. बाबांचे किराण्याचे
दुकान भरभराटीत होते. वर्षभरात आत्याचेही लग्न झाले. ती सासरी गेली व आई काही
दिवसात एका मुलीची आई बनली. घरात अगदी आनंद होता. पण ते ईश्वराला मान्य
नव्हते. माझ्या आत्याचे मिस्टर वर्षभरातच अल्पशा आजाराने निधन पावले. घरात
शोककळा पसरली , १६ वर्षांची आत्या पती निधनानंतर माहेरी परतली. मुलबाळ नाही ,
आणि आली ती कायमचीच , अशा दुखद वातावरणामुळे आजोबांची तब्येत बिघडली . त्या
धक्क्यामुळे तेही सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले.
आलेले दुख दुप्पट झाले , वातावरण चिंतेने वेढले. सर्वांच्या तोंडावर
हास्याऐवजी अश्रू असे. आईचे लग्न होऊन २-३ वर्षे झाली पण कसलीही मौज नाही ,
मजा नाही , नाटक नाही , सिनेमा नाही कि बाहेर फिरणेही नाही. आपण बाहेर जोडीने
गेलो तर नणंद ला किती वाईट वाटेल ? आपण चांगले जरीचे कपडे घातले तर तिला किती
वाईट वाटेल ? दोघी नणंद-भावजया बरोबरीच्या वयाच्या. एकाच्या दुखामुळे
दुस-यालाही आनंद उपभोगताना वाईट वाटे व एकूण काहीच होत नसे.
एवढेच काय पण आई-वडिलांच्या वैवाहिक जीवनात स्तुडिओत जाऊन त्यांनी एक जोडीचा
फोटोही काढला नाही , ज्याच्यामुळे मला माझ्या बाबांची तोंड ओळख तरी झाली असती.
घरात दर दोन वर्षांनी पाळणा हलू लागला आणि दर वेळेस कन्या रत्नांची संख्या
वाढू लागली. पुत्र जन्माचा योग मात्र आलाच नाही. ५ मुलींचा एका पाठोपाठ जन्म
झाला.
मी १० महिन्यांची झाली आणि परत एकदा दुखाचा डोंगर कोसळला. बाबा दुकानाच्या
खरेदीला मुंबईला गेले व तेथे त्यांना ताप आला. हळूहळू ताप खूप वाढला. दोन दिवस
ताप उतरेना. त्यांच्या ओळखीच्या कोणीतरी त्यांना अहमदनगरला आमच्या घरी
पोहोचवले. पण रस्त्यात त्यांचा ताप एवढा वाढला की त्यात त्यांची वाचा बंद
झाली. घरी आले , डॉक्टर आले , डॉक्टरांनी ज्वराचे निदान केले. उपचार सुरु
झाले. पण ताप उतरेना. डोक्याजवळ आजी , पायाकडे आई , सर्वात मोठी बहीण १०
वर्षांची व मी १० महिन्यांची अशा ५ चिमुरड्या मुली तोंड केविलवाणे करून घरात
उदासिन वावरत होतो. काका नाही , मामा नाही , आत्याचे मिस्टर नाही , की मावशी
नाही. कोणीही जबाबदार पुरुष घरात नाही. माझे आजोबाही (आईचे वडील) बरेच वयस्कर
, काय करावे त्यांनाही काही सुचेना. आणि अखेर ९ व्या दिवशी सर्वांना अनाथ करून
बाबांनी हे जग सोडले.
घरावर शोककळा पसरली. कोणी काय बोलावे ? आजीचा एकुलता एक मुलगा वय फक्त ३०
वर्षे आणि सर्वांना सोडून गेला. आईचे वय २५ वर्षे ज्या वयात आजकाल मुलींचे
लग्नही होत नाही , त्या वयात ती विधवा झाली. डोक्यावर आकाश कोसळले ते दुखाचे
पहाड कसे झेलावे ? आजही तो विचार मनात आला की वाटते काय तो भयानक प्रसंग असेल.
लहान लहान ५ मुली , तिकडे सासू आणि आई. नियतीचे क्रूर कृत्य कोणीही थांबवू
शकले नाही. काळानी त्यांच्यावर झडप घालून त्यांना नेलेच. आम्ही सर्व पोरके
झालो.
आत दुकानाचे कोण बघणार ? जमाखर्च सगळा लिहिलेला होता. आईचे वय २५ वर्षे ,
खेड्यात वाढली , शिक्षण कमी , व्यवहाराची माहिती नाही. पण व्यवहारात चतुर ,
प्रखर बुद्धिमत्ता , स्वाभिमानी , सत्याची कास धरणारी , धीर , गंभीर , प्रेमळ
असे सर्वांगीण व्यक्तिमत्व असणारी माझी आई! तिने निर्णय घेतला आणि वह्या
जमाखर्चाच्या पाहायला सुरुवात केली. मदतीला आजोबा होते.
बाबांच्या अकस्मात निधनाने सर्वच व्यवहार बंद झाले. दुकानाचे कोण बघणार ?
कर्जदार कर्ज वसुली साठी दाराशी उभे राहिले. उधारी मात्र वसूल होईना ; कर्ज
कसे फेडावे , वसुली कशी करावी ? मोठा यक्ष प्रश्न होता. काही सुचेना , अखेर
कठोर मानाने आईने निर्णय घेतला ; दुकान व दुकानातील सामान विकू आणि सर्वांचे
कर्ज पै-पैनिशी फेडून टाकू. कमी पडणारी रक्कम स्वतःचे दागिने विकू असे ठरले.
पण तेही नियतीला मान्य नव्हते. त्यातच अजून एक घटना घडली.
बाबांनी मुंबईला जाताना एका नातेवाईकांचे कर्जाचे पैसे परत केले होते , तसे
त्यांनी घरीही सांगितले की आज हि रक्कम मी त्यांना दिली आहे. परंतु तशी पावती
घेतली नाही , विश्वासावर व्यवहार चालत असे. परंतु अचानक बाबांच्या मृत्यूमुळे
व पावती न घेतल्यामुळे त्यांची बुद्धी बदलली व त्यांनी परत पैशाची मागणी केली.
आणि दिलेल्या रकमेबद्दल ते नाकबूल झाले. काय करणार ? त्यांनी कोर्टात दावा
केला. आणि पावती अभावी तो त्यांनी जिंकला.
त्यांनी दुकानावर जप्ती आणली , दुकानासाहित सर्व सामान विकून त्यांनी त्यांचे
कर्ज वसूल केले. मात्र आईला संकटात लोटले. कर्ज फेडण्याचा तोही मार्ग बंद
झाला. आता काय करावे ? गावी काही जमीन व घर होते. ते सर्व विकले आणि सर्व कर्ज
व्याजासहित फेडले. उधारी मात्र पैशाचीही वसूल झाली नाही.
आता कुटुंबाचा सर्व भार तिच्यावर होता. तो कसा पेलावा ? शिक्षण नाही , कला
नाही , काय करावे काही सुचेना , अशा वेळी माझे आजोबा (आईचे वडील) खंबीरपणे
आईच्या पाठीशी उभे राहिले. आईच्या पाठीवरून मायेचे हात फिरवत तिला म्हणाले , "
पोरी , आज मला धन्य वाटले. ज्या लहान वयात तू एवढ्या मोठ्या संकटावर धैर्याने
मात केली ते बघून मी धन्य झालो. तू काही काळजी करू नको. जी थोडी फार शेती माझी
आहे , त्यात धन्य पिकते आहे ते मी तुला पाठवीन. पण याच बरोबर माझी तुला एक
शिकवण आहे , तू तुझ्या पायावर उभे राहावे. तू काहीतरी शिक आणि स्वतःच्या
कर्तबगारीने मोठी हो. जीवनात आदर्श निर्माण कर , कष्ट करायला लाज नाही , भीक
मागायला लाज आहे. कोणासमोर हाथ पसरू नको. कोणावर अवलंबून राहू नको. तुझे वय
फार लहान आहे , आयुष्य फार लांब आहे व जबाबदारी मोठी आहे. धैर्याने सामोरी जा
, यश मिळव."
आई ती जबाबदारी पेलण्यासाठी निश्चयाने उभी राहिली. तिने प्रण केला "मी रडणार
नाही , हतबल होणार नाही. माझ्या कर्तबगारीने मी परिस्थितीवर विजय मिळवीन. भले
माझ्याजवळ धन नसेल , पैसा नसेल पण चारित्र्य आहे. मुलींना असे घडवीन की त्या
त्यांच्या आयुष्यात कधीही डगमगणार नाहीत. त्यांना ते सर्व देईन , संस्कारी
बनवीन."
मग तिने कामाचा श्री गणेश केला. घरात बसून पापड लाटणे , दळण दळणे इत्यादी घरात
बसून ती अनेक कामे करू लागली. त्याच बरोबर शिवणकाम व जरीकाम शिकू लागली. घरचा
चरितार्थ चालवू लागली. आजोबा धन्य पाठवीत होते , आम्ही बहिणी शाळेत जात होतो.
त्या वेळेस आमचा समाजात अहमदनगरला अशी पद्धत होती की प्रत्येक बांधवांनी
छोटीशी ठराविक रक्कम पंचायतीमध्ये जमा करावी. त्यातून काही सामाजिक सण साजरे
होत. विधवा स्त्रियांसाठी ती रक्कम माफ असे. शिवाय त्या फंडातून त्या गरजू
स्त्रियांना मदतही करत. पण माझी आई स्वाभिमानी व करारी होती , तिने त्या
फंडातून मदत तर घेतली नाही , उलट दरवर्षी त्या फंडामध्ये जमेल तेवढी रक्कम जमा
करून स्वतःचे सामाजिक
Sachin Surve <sachin.donsurve@gmail.com> Feb 15 12:52PM +0530
खूप मन हेलावणारी चरित्र कथा आहे .....
आई ...............................
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
> For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
--
*साभार !*
*
*
*सचिन सुर्वे....*
*
*
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 01:05PM +0530
khup sundar katha aahe.................
2013/2/15 Sachin Surve <sachin.donsurve@gmail.com>
vinayak rane <ranevinayak89@gmail.com> Feb 15 12:50PM +0530
*कुणालाच नाही ठाऊक कोण इथे आपल्यासाठी जगतंय?
स्व:ताचं विसरून जग...कुणीतरी आपल्यासाठी मागतंय...
कुणीतरी देवापुढे आपल्यासाठी हात मनापासून जोडतंय....
आपल्याला स्व:ताचं मन समजून अगदी मनापासून बोलतंय....
कुणालाच नाही ठाऊक आयुष्यात कोण कोण येणार....
कोण आपल्याला साथ देणार..कोण आपलं सर्वस्व नेणार...
कोणासोबत हसता हसता डोळ्यात पाणी येणार....
रडता रडता कुणीतरी आपल्याला आपलं हसणं देणार.......
कुठेतरी कुणालातरी आपल्यासारखेच असे प्रश्न पडणार.....
कुणीतरी आपलं उत्तर.....अन् आपणही कुणाचं तरी उत्तर बनणार.....
अपेक्षांना जरासं छोटं करावं नंतर हे सारं जग बघावं....
दु:खाचं कारण आपल्या स्व:तात असतं...
*
--
*Regards,*
*Vinayak Rane** **?*
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 12:56PM +0530
*अपेक्षांना जरासं छोटं करावं नंतर हे सारं जग बघावं....
दु:खाचं कारण आपल्या स्व:तात असतं.....apratim.................*
2013/2/15 vinayak rane <ranevinayak89@gmail.com>
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 12:30PM +0530
*१० :१५ ची CST लोकल*
ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा
गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या
जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी..
बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं..
त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती..
त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री
केली.. रुमाल काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला
मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच
हेलो हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न
केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..!
पण..शांत राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर
नाहीये ना..!
खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर
त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे..
रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून... त्याने तिला दिलेलं
स्मितहास्य..अन त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत
गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा
प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य
नव्हतं..घडू नये तसचं घडलं..
एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा.... बायकांच्या
किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे
वातावरण भयानक.. "कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली " अश्या हाका. ट्रेन
मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण ... ट्रेन थांबण्या
आधीच ..सार संपलं होतं... तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली
होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही
समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला
कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले...या
परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि
पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून
पूर्णपणे ढासाळून गेलं होतं…नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला ….
मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे
क्षण आठवायला लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची
झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती... आयुष्य
हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच
जागी तो ..एकटाच रडत बसला. .
आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची
CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोज शोधत
राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत
शांत बसतो..
*आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच
लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा..
घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा
विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा.. [image: :)]*
--
Thanks & Best Regards,
,Namdev Patil
(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´
"प्रशांत कुळकर्णी " <prashantbkulkarni1978@gmail.com> Feb 15 12:42PM +0530
खुपच अप्रतिम असा मसेज दिला आहे अणि सग्ल्यानी हा मसेज नक्की वाचावा अणि तशी
कालजी घ्यावी
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
--
<http://sig.graphicsfactory.com/> <http://sig.graphicsfactory.com/>
"Be careful in your thoughts when you are alone". and "Be
careful in your words when you are in a crowd"
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 12:44PM +0530
nice story...............
2013/2/15 प्रशांत कुळकर्णी <prashantbkulkarni1978@gmail.com>
vinayak rane <ranevinayak89@gmail.com> Feb 15 12:45PM +0530
धन्यवाद नामदेव पाटील
2013/2/15 प्रशांत कुळकर्णी <prashantbkulkarni1978@gmail.com>
--
*Regards,*
*Vinayak Rane** **?*
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 12:37PM +0530
तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एक मेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल, म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..
१५ ऑगस्ट चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.
ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो…तो म्हणाला.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?…
आय नो.. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १५ ऑगस्ट ला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल…तुला संसारा साठी.
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन…
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. …..
continue…..
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
१५ ऑगस्ट.. तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति येइल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्लाउज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..
जाउ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मल पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता…
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुम च घर आहे… तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर…. वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि…ति.
बरोबर आहे. निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..
तो बराच वेळ तो बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.
टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,
सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
--
Thanks & Best Regards,
,Namdev Patil
(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´
Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com> Feb 15 12:40PM +0530
nice.....................
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 12:09PM +0530
"आमचा बाप"
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही
विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो
आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही
लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ
केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला
हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही
म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप
स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून
मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता
गवसतोय.
--
Thanks & Best Regards,
,Namdev Patil
(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´
"प्रशांत कुळकर्णी " <prashantbkulkarni1978@gmail.com> Feb 15 12:25PM +0530
खुपच सुन्दर नामदेव,अप्रतिम आहे
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
--
<http://sig.graphicsfactory.com/> <http://sig.graphicsfactory.com/>
"Be careful in your thoughts when you are alone". and "Be
careful in your words when you are in a crowd"
Namdev patil <patilnamdev143@gmail.com> Feb 15 12:28PM +0530
Thanku Prashant
2013/2/15 प्रशांत कुळकर्णी <prashantbkulkarni1978@gmail.com>
--
Thanks & Best Regards,
,Namdev Patil
(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´
"प्रशांत कुळकर्णी " <prashantbkulkarni1978@gmail.com> Feb 15 12:38PM +0530
wel-come
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
--
<http://sig.graphicsfactory.com/> <http://sig.graphicsfactory.com/>
"Be careful in your thoughts when you are alone". and "Be
careful in your words when you are in a crowd"
"प्रशांत कुळकर्णी " <prashantbkulkarni1978@gmail.com> Feb 15 12:19PM +0530
khupach mast ahe
2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
--
<http://sig.graphicsfactory.com/> <http://sig.graphicsfactory.com/>
"Be careful in your thoughts when you are alone". and "Be
careful in your words when you are in a crowd"
Sachin Surve <sachin.donsurve@gmail.com> Feb 15 12:23PM +0530
2013/2/15 प्रशांत कुळकर्णी <prashantbkulkarni1978@gmail.com>
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
> For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
--
*साभार !*
*
*
*सचिन सुर्वे....*
*
*
You received this message because you are subscribed to the Google Group mannmajhe.
--
You can post via email.
To unsubscribe from this group, send an empty message.
For more options, visit this group.
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
No comments:
Post a Comment