Thursday, February 14, 2013

Re: ♡ मन माझे..♡ १० :१५ ची CST लोकल Must Read

धन्यवाद नामदेव पाटील 

2013/2/15 प्रशांत कुळकर्णी <prashantbkulkarni1978@gmail.com>
खुपच अप्रतिम असा मसेज दिला आहे अणि सग्ल्यानी हा मसेज नक्की वाचावा अणि तशी कालजी घ्यावी 

2013/2/15 Namdev patil <patilnamdev143@gmail.com>
१० :१५ ची CST  लोकल
            ट्रेन सुटली ..धावता   धावताच  तो चढला .. धावत पळत..  कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या   दरवाज्या जवळ… तो  पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात   असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन   पाहिलं..  त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती..  त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या  दरवाज्याजवळ येऊन परत खात्री   केली.. रुमाल  काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला   मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला..  नुसताच हेलो  हेलो ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने   पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा   निर्णय घेतला..!  पण..शांत  राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती  कुठे बसली तर   नाहीये ना..!

                खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर   त्याने तिची वाट  पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे..   रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..!  गर्दीतून... त्याने तिला दिलेलं   स्मितहास्य..अन त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत   गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा   प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य   नव्हतं..घडू नये तसचं घडलं..

            एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा.... बायकांच्या   किंकाळ्या.. माणसांची गडबड..  ट्रेन थांबवण्यासाठीची  लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. "कोणी चैन   खेचा चैन खेचा..मुलगी पडली " अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर   पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण ... ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं   होतं... तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर   ट्रेन आणि  प्लाटफोर्म  मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या   आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून   गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले...या परिस्थितीत काय   करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी..   राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून   गेलं होतं…नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला …. मगाशीच आल्या   आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला   लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय   अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती... आयुष्य हे किती   क्षणभंगुर असतं..  ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .   

             आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी..  १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोज शोधत  राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे   आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय   घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन   हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा.. :)
 
--
Thanks & Best Regards,

,Namdev Patil  

(¨`•.•´¨) Always
`•.¸(¨`•.•´¨) Keep
(¨`•.•´¨)¸.•´ Smiling! ,,,,
` • .¸.•´

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
--

"Be careful in your thoughts when you are alone". and "Be
careful in your words when you are in a crowd"

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
--
Regards,
Vinayak Rane ?

No comments:

Post a Comment