Friday, March 1, 2013

{|| मनस्पंदन ||} असही प्रेम असत

एकदा एक झाड वेलीच्या प्रेमात पडल 
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल 

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नान त्याला पछाडल 
पण आपण जर धीर धरावा अस म्हणत त्याने स्वताला सावरल 

वेल मात्र आपली हसत खेळत राहात होती 
ते पाहून झाडने तिच्याशी मैत्री केली होती 

काही दिवसांनी वेल मात्र जमिनीवर पसरू लागली 
ते पाहून झाडने तिची विचारपूस केली 

वेल म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे 
तू मला आधार देशील का?
यावर झाड म्हणाले तू माझी होशील का ?

ते ऐकताच वेलींने नकाराथ्री मान हलवली 
ते पाहून झाडाची निराशा झाली 

हिरमुसलेले ते झाड क्षणभर विचारात पडले 
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन  दिले 

वचन देताच वेल मात्र झाडाला बिलगली 
आणि हसता हसता  त्याची आसवे हळूच ओघळली 

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला 
कारण … तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला 

--
--
You received this message because you are subscribed to the Google
Groups "|| मनस्पंदन ||" group.
To post to this group, send email to spandanhrudayache@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
spandanhrudayache+unsubscribe@googlegroups.com
For more options, visit this group at
http://groups.google.com/group/spandanhrudayache?hl=en?hl=en
 
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "|| मनस्पंदन ||" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to spandanhrudayache+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment